आपली कामे

14 January, 2020

म्हसरूळ प्रभागात स्वखर्चाने धूर फवारणी

हो ! आपण हे केलं आहे.

गेल्या ५ वर्षांपासून डेंग्यु-मलेरिया व चिकनगुणिया ह्या सारख्या रोगांवर प्रतिबंध व्हावा यासाठी ३० हजार व १० हजार रुपयांचे धुरफवारणी मशीन विकत घेतले असून माझ्याकडून आज देखील नियमित डेंग्यु- मलेरिया प्रतिबंध धुरफवारणी मोहीम सुरु आहे.

22 may, 2021

अपघाती विमा वाटप

हो ! आपण हे केलं आहे.

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेरी म्हसरूळ परिसरातील गरजू नागरिकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा ८० नागरिकांना ८० लाख रुपयांचा अपघाती विमा मोफत वाटप केला.

28 july, 2021

आपल्या प्रभाग 1 मेरी म्हसरूळ परिसरात 2 लाख 56 हजार रु चे स्वखर्चाने CCTV कॅमेरा लावले

हो ! आपण हे केलं आहे.

वाढत्या सोनसाखळी चोरी व घरफोड्या व्या घटना लक्षात घेत आपल्या मेरी म्हसरूळ बोरगड परिसरातील माझ्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी आपण स्वखर्चाने २ लाख ५६ हजार रुपयांचे CCTV कॅमेरे लावले आहे.

16 december, 2020

कोरोना काळात मोफत ऑक्सीजन सेवा

हो ! आपण हे केलं आहे.

कारोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान निर्माण झालेली ऑक्सिजन ची कमतरता लक्षात घेता आपण स्वखर्चातून ७ व लोकवर्गणीतून १ असे एकूण ८ ऑक्सिजन मशीन विकत घेतले असून ते मोफत कोरोना रुग्णांना वापरण्यासाठी दिले आज तगायत ही सेवा मोफत चालू असून ४७५ नागरिकांना ह्या सेवेचा लाभ झाला.

परिचय
नमस्कार!

'मी गणेश किसनराव पेलमहाले मूळ दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील. आमचा पेलमहाले परिवार हा साधारणपणे १९४५ साली नाशिकच्या पंचवटी येथील जोशी वाडा येथे रोजगारासाठी स्थायिक झाला व गेल्या ४० वर्षांपासून आपल्या म्हसरूळ परिसरात वास्तव्यास आहे. माझा जन्म हा म्हसरूळचाच असल्याने, लहानपणापासून ह्या आपल्या परिसरातील जवळपास सर्वच लोक परिचित आहेतच, शिवाय गेल्या १४ वर्षां पासून आपल्या सगळ्याच्या आवडत्या सोहम मिसळ च्या माध्यमातून आमचा समस्त पेलमहाले परिवार अतिशय प्रामाणिक व मन लावून आपल्या सेवेत आहे.लहानपणापासून स्वाध्याय परिवार व स्वामी समर्थ अध्यात्म केंद्रच्या संस्कारात लहानाचा मोठा झालेला असल्याने सेवाभावी वृत्ती व जबाबदारी ची जाणीव ही त्याच संस्काराचे बाळकडू होते. म्हणून च १० वी नंतर इलेक्ट्रॉनिक्स चा व्होकेशनल कोर्स केल्यावर परिवाराची साधारण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यात सोडून ६ महिने STD, PCO मध्ये नंतर ३ वर्ष पंचवटी- मेरी- म्हसरूळ मार्गावर रिक्षा चालक म्हणून व नंतर ७ वर्षे स्वतःच्या ट्रक वर चाऱ्याचा व्यवसाय केला. २००८ पासून आपल्या सोहम मिसळ हा हॉटेल व्यवसाय करत सगळ्याच स्तरातून सामाजिक बांधिलकी जपत... अधिक माहिती.

Yes We Can......

आणि हो! आपल्या प्रभागासाठी आपण हे करू शकतो.......

आम्हाला मत द्या

मत तुमचे, मेहनत आमची

आम्हाला का निवडून द्यावे ?

आमचे यश

  • मराठी पत्रकार संघ तर्फे कार्यगौरव पुरस्कार २०२०
16

२ लाख ५६ हजार चे CCTV कॅमेरे

80

८० लाखाचे अपघाती विमा

1235

१२३५ नागरिकांचे कोवीड लसीकरण

475

४७५ नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा

संस्कार राष्ट्रवादी चे, वसा जनसेवेचा.

ALEXANDER GARY

श्री. गणेश किसनराव पेलमहाले

MELISSA MUNOZ

सौ. वंदना गणेश पेलमहाले

उद्याच्या उज्वल भविष्यासाठी आम्हाला साथ द्या.

सामाजिक काम करत असतांना बऱ्याचदा मर्यादा येतात का तर आपल्याकडे अधिकार नसता म्हणून यासाठीच मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नाशिक महानगरपालिका २०२२ पंचवार्षिक निवडणूक लढवीत आहे. आज पर्यंत जी पण सेवा केली ती आपल्या मायबाप जनतेच्या व थोरामोठ्याच्या चरणी अर्पण करतो व अशीच सेवा अधिक अधिक घडो ह्यासाठी आपल्याकडे संधी च दान मागतो. आपण सर्व नागरिक आजपर्यंत मि केलेल्या कामाचे साक्षीदार आहात, कुठलीही मदत करताना मी कधी कुणाला कुठल्या जातीचा, धर्माचा किंवा कुठल्या पंथाचा आहे हे बघितले नाही. केवळ माणसाला माणूस म्हणून बघितले आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले, आता वेळ तुमची आहे लोकप्रतिनिधी निवडतांना काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्या इतकीच अभिलाषा.

संवाद साधा संपर्क साधा

कामे

Back To Top